मोटार सायकल चोरास अटक, चोरलेल्या सहा मोटार सायकल जप्त
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बीड : बीड मध्ये मोटार सायकल चोरणाऱ्या इसमांची माहीती काढून कारवाई करण्यचे सुचना मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरी करणाऱ्या ईसमांची माहीती काढण्यासाठी प्रयत्ना करीत असताना रेकॉर्डवरील आरोपी नामे जिवन रामदास गाडे, वय 24 वर्ष, रा.बार्शी नाका, बीड पास चोरीची दुचाकीसह पोलीसांनी परळी रोड येथे सापळा लावून पकडले. आरोपीनामे जिवन रामदात्त गाडे यास ताब्यात घेवुन विचार पूस केला असता त्याने ईतरही बीड शहरातील व पुण्यामधील मौटार सायकली चोरल्याचे निष्पन झाले. सदर आरोपीकडून एकूण सहा मोटार सायकली जप्त करण्यात येवुन 3,50,000/- (तीन लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मोटार सायकलच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी नामे जिवन रामदास गाडे याचे कडून खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र. नं 321/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
2. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 103/2023 कलम 379 भा.दं. विधान
3. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र. नं 199/2023 कलम 379 भा.दं. विधान
4. पोलीस ठाणे चंदननगर, पुणे शहर गु.र.नं 255/2024 कलम 379 भा.दं.विधान
5. पोलीस ठाणे भोसरी गु.र.नं 1037/2023 कलम 379 भा.दं. विधान
वरील पाच मोटार सायकलचे गुन्हे आरोपी नाने जिवन रामदास गाडे याने केल्याचे कबुली दिली आहे. तसेच ईतर एक मोटार सायकल बाबत कोणताड़ी अभिलेख मिळून आला नाही. त्या बाबत पोलीस तपास करीत आहे सदरचा जिवन रामदास गाडे हा यापूर्वी वडवणी पोलीस ठाणे यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात अटक केली होती. सदरील कारवाई श्री नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड. श्री सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड, श्री शिवाजी बटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्र मुरकुटे, पोलीस हवालदार विलास राठोड, राहुल शिंदे, मनोज परजणे, आशपाक सय्यद, सुनील राठोड यांनी केली आहे.