20.3 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे पवार, खाटोकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बीड : मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी आदेशीत केले होते की, पोलीस ठाणे शिवाजीनगर गुरनं 354/2025 कलम 74,75,76,78,3(5) भारतीय न्याय संहीता सह कलम 8.9.10.12 पोस्को मधील फरार आरोपी नामे विजय दादासाहेब पवार व प्रशांत भगवान खाटोकर यांचा शोध घेवुन त्यांना सदर गुन्हयामध्ये तात्काळ अटक करा. त्यावरुन पोलीस निरीक्षक बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी सदर आरोपी शोधण्यासाठी तीन पथके तयार केली. गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, गुन्हयातील फरार असलेले आरोपी नामे विजय पवार व प्रशांत खाटोकर हे मांजरसुंबा येथे भेटणार आहेत, त्यावर पथकांना सदर बाबत माहीती दिली त्यावरुन आरोपी नामे विजय दादासाहेब पवार वय 47 वर्षे रा. सहयोगनगर बीड यास लिंबागणेश येथुन दिनांक 28/06/2025 रोजी 11.30 वा. सुमारास ताब्यात घेवुन त्याची सफारी गाडी जप्त करण्यात आली तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या माहीतीवरुन आरोपी नामे प्रशांत भगवान खाटोकर वय 28 वर्षे रा. वानवळ गल्ली, वडवणी ता.वडवणी जि.बीड ह. मु. जवाहर कॉलनी बीड यास चौसाळा ता.जि.बीड येथुन दिनांक 29/06/2025 रोजीचे 01.30 वा सुमारास ताब्यात घेण्यात आलेले आहे. वरील दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांना पुढील तपास कामी पिंक पथक उपविभाग बीड प्रमुख सपोनि श्री. लांडगे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नवनीत काँवत मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, श्री. शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक खटावकर, महेश विघ्ने, श्रेणी पोउपनि सुर्यकांत गुळभिले, पोलीस अंमलदार महेशर जोगदंड, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, सुनिल अलगट व सिद्धार्थ मांजरे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या