20.3 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img

बीडच्या उमाकिरण खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण!

बीड : शहरातील उमाकिरण या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नावे आहे. बीड शहरातील उमाकिरण या खाजगी कोचिंग क्लासेस मधील दोन शिक्षक प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघेही पीडितेला वारंवार क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलवत असत. यावेळी ते पीडितेचा जबरदस्तीने तिच्याशी अश्लिल वर्तन करणे, मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढायचे असे फिर्यादीत म्हटलेले आहे. या प्रकारामुळे पीडितेवर मानसिक आघात झाला असून, तिने घडलेली संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध पोस्को कायदा आणि भारतीय दंडविधानातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या