21.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

चोरीस गेलेले साडे दहा लाखाचे दागिने फिर्यादीस परत

  • चोरीस गेलेले साडे दहा लाखाचे दागिने फिर्यादीस परत

बीड : पोलीस ठाणे बीड शहर येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांचे घरातून दागिने चोरी गेले होते. बीड शहर पोलिसांकडून चोराचा शोध घेऊन त्याला अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दिनांक 23 जून रोजी चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने मुद्देमाल हा मुळ मालकास परत करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांनी आभार व्यक्त केले. पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढीस लागला आहे. पोलिस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री सचीन पांडकर, शितलकुमार बल्लाळ, सहा.पोलीस निरीक्षक-बाबा राठोड व पोलिस अंमलदार बालाजी मुळे यांचे उपस्थितीत सोन्याचे दागिने फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या