17.2 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

आरसीबीने अखेर विजेतेपदावर नाव कोरलं

आरसीबीने अखेर विजेतेपदावर नाव कोरलं

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये आपले पहिले विजेतेपद जिंकले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी हरवले. १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीबीकेएसला फक्त १८४ धावा करता आल्या. १८ व्या हंगामात आयपीएलला आठवा विजेता मिळाला. बंगळुरूकडून विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. कृणाल पंड्याने १७ धावा देऊन २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनेही २ विकेट्स घेतल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि काइल जेमीसन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

Related Articles

ताज्या बातम्या