भीषण अपघातात माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन
बीड : माजलगावचे माजी आमदार तथा आर. टी. देशमुख यांचे रस्ता अपघातात निधन झाले. तुळजापूर – लातूर रस्त्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला असून त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. आर. टी. देशमुख हे सोलापूर येथून माजलगावकडे परतत असताना हा अपघात झाला. जोरदार पावसामुळे रस्ता ओला व निसरडा झाल्याने त्यांची चारचाकी (फॉर्च्यूनर) नियंत्रणाबाहेर गेली आणि बेलकुंडजवळील राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकावर जोरात आदळली.
माजी आमदार आर. टी. देशमुख आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करीत होते. सोमवारी दुपारी त्यांच्या वाहनाचा गंभीर अपघात झाला. यात आर. टी. देशमुख जखमी झाले त्यांना तातडीने लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.