पांढरवाडीत बीड स्थानिक गुन्हे शाखेचा छापा तब्बल ४० लाखांचा गुटखा जप्त ; एका विरुध्द गुन्हा दाखल
बीड : मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा. बीड यांनी अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अवैध धंद्ये करणारांची गोपनिय माहिती काढुन कारवाई करण्यासाठी स्थागुशा पथकांना सुचना दिलेल्या आहेत. त्यावरुन दिनांक 20/05/2025 रोजी स्थागुशा बीड येथील पोउपनि सुशांत सुतळे, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे हे वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे गेवराई हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे पांढरवाडी, ता. गेवराई येथे इसम नामे दादासाहेब अंकुश जाधव हा त्याचे घरामध्ये मोठयाप्रमाणात गुटखा, पानमसाला साठवुन ठेवलेला आहे. तेव्हा सदरची माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांना कळवुन त्यांनी त्वरीत कारवाई करण्याचे आदेश पोउपनि सुशांत सुतळे यांचे पथकांना दिले. त्यानंतर स्थागुशा पथकाने खबरी ठिकाण पांढरवाडी येथील इसम नामे दादासाहेब अंकुश जाधव रा. पांढरवाडी याचे राहते घरी छापा टाकला असता तो मिळुन आला व त्याचे घराचे झडतीमध्ये त्याने स्वतःचे फायद्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत स्वादिष्ठ पानमसाला, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ वर बंदी असतांना देखील विनापरवाना, बेकायदेशीररित्या घरामध्ये व त्याचे मालकीचे बोलेरो पिकअप, स्विप्ट डिझायर वाहनामध्ये गुटखा, पानमसाला, तंबाखु जन्य पदार्थाचा एकुण 40,31,600/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीने काही गुटखा जन्य पदार्थ कर्नाटक राज्यातुन व काही इंदुर (राज्य मध्यप्रदेश) येथुन आणल्याचे निष्पन्न झालेले असुन त्यात दोन आरोपींचे नावे निष्पन्न करण्यात आलेली आहे. आरोपीस पोलीस स्टेशन येथे हजर करुन त्याचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 123,223,274,275, 3(5) अन्वये पोउपनि सुशांत सुतळे स्थागुशा, बीड यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. सदरची कामगिरी मा.श्री. नवनित कॉवत पोलीस अधीक्षक, बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा. बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, पोह/विष्णु सानप, राजु पठाण, राहुल शिंदे, विकास राठोड, मनोज वाघ, कैलास ठोंबरे, विकास वाघमारे, चालक नितीन वडमारे व चालक सुनिल राठोड यांनी मिळुन केलेली आहे.