9.4 C
New York
Thursday, May 22, 2025

Buy now

spot_img

सख्या चुलत्यानेच केला पुतणीवर अत्याचार, आरोपीला मरेपर्यंत आजीवन कारावासची शिक्षा

सख्या चुलत्यानेच केला पुतणीवर अत्याचार, आरोपीला मरेपर्यंत आजीवन कारावासची शिक्षा

बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बीड : ता. आष्टी, जि.बीड पिडीत अल्पवयीन मुलीवर (पुतणीवर) बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपीस अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश -१ बीड मा. एस. आर पाटील मॅडम यांनी कलम ३७६ (२) (१),३७६ (२) (n),३७६ (३) भादवी व कलम ६ बाल लैंगीक अत्याचारः प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये दोषी ठरवुन कलम ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये आरोपीच्या नैसर्गिक मृत्युपर्यंत आजन्म कारावास व २५,०००/- रूपये दंड तसेच कलम ५०६ भादवी अन्वये ६ महिने साधा कारावास व ५००/- दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, ऑगस्ट २०२३ मध्ये पिडीतेच्या पोटदुखीच्या आजारावरून डॉक्टराकडे तपासणीसाठी घेउन गेल्यानंतर संबंधीत डॉक्टरांनी पिडीतेस पुढील तपासणीसाठी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील तज्ञ डॉक्टराकडे पाठविले असता तज्ञ डॉक्टरांच्या तपासणी मधे पिडीता हि ७ महिन्याची गरोदर असल्याचे निर्देशनास आले त्यावरून पिडीतेच्या आईने पिडीता हि १३ वर्षाची अज्ञान बालिका असुन तिचे अज्ञानाचा फायदा घेउन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला अशा अशयाच्या फिर्यादी दिली. त्यावरून प्रस्तुत प्रकरणातील आरोपी विरूद्ध तोफखाना पो. स्टे अहिल्यानगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्हा हा अंभोरा पो.स्टे ता. आष्टी जि. बीड च्या कार्यक्षेत्रात येत असल्याने सदरील गुन्हा पो.स्टे अंभोरा ता. आष्टी यांच्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला. सदर तपासादरम्यान फिर्यादी व इतर साक्षीदार व वैद्यकीय पुरावा यावरून प्रस्तुत प्रकरणातील अरोपी विरूद्ध सबळ पुरावा आढळल्याने विशेष सत्र न्यायालय बीड येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. प्रस्तुत प्रकरणाचा तपास सुरवातीला ए.पी.आय श्री बी.सी. गोसावी, ए.पी.आय श्री डी.बी कोळेकर व त्यांनतर श्रीमती सुरेखा.एस.धस, म.स.पो.नि. अ.मा.वा.प्र. कक्ष यांनी केला.सदर प्रकरणात आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध करण्याकामी पिडीता, फिर्यादी, डॉक्टर, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा येथील तज्ञ व इतर एकुण १८ साक्षीदार तपाण्यात आले. सदर प्रकरणात पिडीतेचा पुरावा त्याचबरोबर पिडीतेबाबतचा वैद्यकीय पुरावा व प्रकरणातील डी.एन.ए तपासणी अहवाल व इतर साक्षीदार यांचा पुरावा व सहा. सरकारी वकिल अनिल बी. तिडके यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. एस. आर पाटील मॅडम अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ बीड यांनी प्रस्तुत प्रकरणातील आरोपीस कलम ३७६ (२) (f), ३७६ (२) (n), ३७६ (३) भादवी व कलम ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये दोषी ठरवुन कलम ६ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ अन्वये आरोपीच्या नैसर्गिक मृत्युपर्यंत आजन्म कारावास व २५,०००/- रूपये दंड तसेच कलम ५०६ भादवी अन्वये ६ महिने साधा कारावास व ५००/- दंड व दंड न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सहा. सरकारी वकिल अनिल बी. तिडके व अॅड. अजय दि. राख जिल्हा सरकारी वकिल, बीड यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी पोलिस हवालदार ११४ बी बी. शिंदे तसेच अंभोरा पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कर्मचारी एस. आर जेव्हे यांनी सहकार्य केले.

ads

Related Articles

ताज्या बातम्या