4.8 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img

मनोज जरांगे पाटलांनी केली उपोषण सोडण्याची घोषणा

मनोज जरांगे पाटलांनी केली उपोषण सोडण्याची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला निशाणा

जालना : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे, मराठा समाजाचं डोळे उघडले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली. तसेच यापुढे शक्यतो आरक्षणाची लढाई बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. उपोषणकर्त्यांशी चर्चा करून यासंबंधित पुढील निर्णय घेण्यात येईल असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले होते. गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू असून या दरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली. तरीही शासन स्तरावरून या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आलं. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एवढे दिवस आंदोलन करावं लागेल असं वाटलं नव्हतं असं मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे म्हणाले की, खरं आहे ते टिकत नाही, जे हक्काचं आहे तेच देत नाहीत. फडणवीस मराठा आरक्षणावर होय पण म्हणत नाहीत आणि नाहीपण म्हणत नाहीत. ते गप्प बसलेत याचा अर्थ त्यांच्या मनात मराठ्यांविषयी किती द्वेष आहे हे कळले. त्यांच्या मनात किती सूड भावना आहे हे समोर आलं. आमच्यासोबत बेइमानी केली तर पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. पण आता आंदोलन थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या