नशेच्या गोळ्या विक्री प्रकरण; मेडिकल चालकासह दोघांना अटक
बीड शहर डी बी पोलिसांची कामगिरी
बीड : नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या दोन जणांना बीड शहर पोलिसांनी तपसात अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल चालक व त्याला पुरवठा करणारा तरुण यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी नशाखोरी आणि त्यापाठीमागील गुन्हेगार यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. बीड शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला हाेता. या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती. त्यांच्याकडून अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडीन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुक शेख आरेफ (रा. इस्मालमपूरा, बीड) या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते. त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन (रा. शहेंशाहर नगर) या गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ६ झाली आहे. सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक श्री सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शन प्रमाणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,सपोनी बाबा राठोड, पोलिस अंमलदार सचिन अलगट, संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, यांनी केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.