30.7 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img

पूर्ण नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवा : बाप्पूसाहेब मोरे

पूर्ण नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवा : बाप्पूसाहेब मोरे

बीडमध्ये शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!

बीड : तळागाळातील माणसांची जाणीव असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्व कर्तृतवाने घरघरात पोहचले. सन्माननीय शिंदे साहेब पूर्ण ताकदीने आपल्या सोबत आहेत. यामुळे आता थांबायचे नाही तर पूर्ण नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम या सूत्रनुसार आपल्याला शहर-ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन मजबूत करायचे आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हा बीड जिल्हाच आहे, हे दाखवून द्यायचं आहे. यामुळे पूर्ण ताकदीने कामाला लागा, स्वतःला सिद्ध करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाप्पुसाहेब मोरे यांनी केले. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि उपनेते अर्जुन खोतकर आणि सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारपासून सलग तीन दिवस बीड जिल्ह्यात विधानसभा निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. परळी, गेवराई, केज, माजलगाव विधानसभा मतदार संघ तसेच वडवणी येथे आढावा बैठक पार पडल्यानंतर काल दि. 21 जुलै रोजी दु. 1.00 वाजताच्या दरम्यान बीड शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यलय येथे अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेची रणनीती, ताकद आणि संघटना या तिन्ही घटकांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत यश मिळवण्यासाठी नियोजन करण्यात आले. पक्ष व संघटना आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने अचूक नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी यंदा शिवसेनेचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, शिवसेना महिला आघाडी, युवासेना, शेतकरीसेना, ओबीसी व्हिजेएन्टीसेना, एसटी कामगार सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी, सरपंच तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या यशस्वीरित्या पार पडलेल्या बैठकीचे सूत्रसंचलन प्रास्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले.

अनिलदादांनी रंगशिंग फुंकले!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कार आशीर्वादांचे तेज, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांचे सहकार्य ताकद व तमाम शिवसैनिकांच्या साथीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असून संपूर्ण बीड जिल्हा भगवामय करणार असल्याचे सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या