24.5 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img

नगररोडवर अपघात होऊ नये म्हणून “यू-टर्न” नाही अभियंता राजेंद्र भोपळे यांना “मोतिबिंदू” झालाय का?

नगररोडवर अपघात होऊ नये म्हणून “यू-टर्न” नाही अभियंता राजेंद्र भोपळे यांना “मोतिबिंदू” झालाय का?

धुळे–सोलापूर महामार्गावरील दुभाजक नसल्याने वाढते अपघात दिसत नाहीत काय?: डॉ. गणेश ढवळे

बीड : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगरनाका दरम्यानच्या रस्त्यावर “यू-टर्न”साठी दुभाजकात जागा सोडलेली नाही. या मार्गावरच्या उत्तरेकडील बाजूस जिल्हा न्यायालय, तहसील, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालय तर दक्षिणेकडील बाजूस शासकीय आरोग्य प्रशिक्षण केंद्र, शासकीय विश्रामगृह, पंचायत समिती, चंपावती क्रीडा मंडळ अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना नगरनाका गाठून पावणेकिलोमीटरचा फेरा मारावा लागतो. यापूर्वी या मार्गावर सहा ठिकाणी “यू-टर्न”ची सोय होती, मात्र यावेळी एकही ठेवण्यात आलेला नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदने दिली, आंदोलने केली, लोकप्रतिनिधींनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या, स्थानिक दैनिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केला तरी राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता राजेंद्र भोपळे यांनी “अपघात टाळण्यासाठी यू-टर्न नाही” असा युक्तिवाद करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चहाटा फाटा दरम्यान केवळ तीन ठिकाणी (नगरनाका, धानोरा रोड, कालिकानगर कमान) यू-टर्न दिले आहेत. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयासमोर यू-टर्न देण्यास “तांत्रिक अडचण” असल्याचे सांगून त्यांनी असहमती दर्शवली आहे. मग बीड शहरांतर्गत धुळे–सोलापूर महामार्गावरील दुभाजक नसल्याने होत असलेले अपघात त्यांच्या डोळ्यांना दिसत नाहीत का? त्यांना मोतिबिंदू झालाय का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

धुळे–सोलापूर महामार्गावरील दुभाजक नसल्याने वाढते अपघात चिंताजनक : डॉ. गणेश ढवळे

बीड शहरातून जाणारा धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणाद्वारे वळवण्यात आला असला तरी शहरातील १२ किमी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. हा रस्ता फक्त दोन लेनचा असल्याने वाहतुकीची कोंडी होते. दुभाजक नसल्याने वाहने कोठूनही वळतात आणि अपघातांचा धोका वाढतो. या रस्त्याचे चौपदरीकरण मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी मजबुतीकरणाचे काम झाले, पण रस्ता अरुंदच राहिला. फक्त बसस्थानक–महावितरण कार्यालय आणि बसस्थानक–जिल्हा रेशीम कार्यालय दरम्यानच दुभाजक आहेत; उर्वरित रस्त्यावर दुभाजक नाहीत. या मार्गावर तासाभरात हजारो वाहने धावतात – बस, खासगी गाड्या, दुचाकी, रिक्षा, मालवाहू ट्रक. पावसाळ्यात मातीमुळे वाहने घसरतात, राष्ट्रवादी भवन ते बार्शी रोडवर तर जागोजागी खड्डे आहेत. म्हणूनच – या मार्गावर तातडीने दुभाजक बसवावेत, सिग्नल व्यवस्था सक्षम करावी, आणि चौपदरीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या