25.6 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img

वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला, पाच जनांवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिंद्रुड : दिनांक १५/०७/२०२५ रोजी पोलीस ठाणे दिंद्रुड हद्दीत मौजे उमरी, ता. माजलगाव येथील अनिल जनार्धन शिंदे याचा वाढदिवस होता. सदर वाढदिवसानिमित्त उमरी गावात मित्रमंडळीसह रात्रीच्या वेळी डीजेवर नाचण्यासह तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर वाढदिवस कार्यक्रमास अनिल शिंदे याचे काही मित्र उपस्थित होते. आपले गावातील व परीसरातील वजन दाखविण्यासाठी वाढदिवसाचा केक तलवारीने कापण्यात आला. सदर कार्यक्रमाचे फोटो काढण्यात आले. तसेच सदरचे फोटो सुनिल जनार्धन शिंदे या त्याच्या भावाने फेसबुक सोशल मिडीयाव्दारे शेअर केले. सदरचे फोटो पोलीस ठाणे दिंद्रुड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर फोटोबावत माहिती मिळविली असता सदरचा वाढदिवस कार्यक्रम हा पोलीस ठाणे दिंद्रुड हद्दीत मौजे उमरी, ता. माजलगाव येथे दिनांक १५/०७/२०२५ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास पार पडला असल्याचे समजले. तसेच सदर फोटोमध्ये तीन तलवारीव्दारे केक कापणाऱ्या चार व्यक्ती नामे १) अनिल जनार्धन शिंदे, वय ३४ वर्षे, २) महादेव प्रताप शिंदे, वय २२ वर्षे, दोन्ही रा. उमरी, ता. माजलगाव, ३) विशाल गवळी, रा. पिंपळगाव (नाखला), ता. माजलगाव, ४) दादा म्हस्के, रा. पात्रुड, ता. माजलगाव असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तलवारीने केक कापल्याबाबतचे सदर वाढदिवसाचे फोटो दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनिल शिंदेचा भाऊ सुनिल जनार्धन शिंदे, रा. उमरी, ता. माजलगाव याने त्याच्या फेसबुक या सोशल मिडीयावर शेअर केले. म्हणून वरील पाचही जनांवर शस्त्र अधिनियम १९८८ अन्वये पो.स्टे. दिंद्रुड येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या एकुण ०३ तलवारी गुन्हयाच्या तपासकामी दिंद्रुड पोलीसांनी जप्त केल्या आहेत. सदरची कारवाई मा. श्री नवनित काँवत साहेब, पोलीस अधिक्षक बीड, मा. श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, मा. श्री निरज राजगुरु साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गेवराई, चार्ज माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे दिंद्रुड येथील श्री महादेव ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोउपनि, संजयकुमार राठोड, सफौ नंदकुमार वाघमारे, पोह/युवराज श्रीडोळे, पोशि/कैलास पोटे यांनी केली.

ads

Related Articles

ताज्या बातम्या