17.2 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन लढवणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन लढवणार

इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा; तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांचे आवाहन

परळी वैजनाथ : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरणार असून, पक्षातील सर्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेतले जाणार आहे. त्याचबरोबर नव्याने पक्षबांधणी सुरू असून, इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांनी केले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या तथा हिमाचल प्रदेश प्रभारी आदरणीय खासदार सौ. रजनीताई पाटील साहेब , माजी मंत्री अशोकरावजी पाटील साहेब, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे साहेब , अखिल भारतीय राष्ट्रीय किसान समन्वयक बाबुराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती गण तसेच गावागावात काँग्रेस पक्षाची बांधणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पक्षातील सर्व जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना तर संधी मिळेलच परंतु नव्याने पक्षात येऊ इच्छित असलेल्या सर्वांना समान न्यायाने संधी दिली जाईल. त्यामुळे पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असेल किंवा आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून भाग घेण्याची इच्छा असेल अशा कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या