23.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

नारायण गड, गड नसून श्रद्धा अस्मिता स्वाभिमान, सुरू असलेले वादंग अशोभनीय : नाईकवाडे – धांडे

बीड : बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी म्हणून प्रचलित असलेले नारायण गड जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या गडाची लोकप्रियता अफाट असून लाखो लोकांची श्रद्धा गडावर आहे. गडाला एका समाजाचेच लोक मानणारे आहे असे मुळीच नाही तर सर्व अठरा पगड जातींच्या लोकांचे गडावर प्रेम आहे गडासोबत अनेकांच्या भावना ,अस्मिता आणि श्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. म्हणून उभ्या महाराष्ट्रातून लाखो भाविक गडाच्या दर्शनासाठी येत असतात असे असताना या सर्व लोकांच्या श्रद्धा ,अस्मिता आणि प्रेमाचा कुठे तरी खेळ मांडल्या सारखी परिस्तिथी झाली आहे. काहींनी हे सर्व का सुरू केले आणि कशासाठी हे सर्व सामान्य लोकांसाठी न सुटणार कोड. आहे. हे कशासाठी होत आहे. कोणाला या प्रकरणाच्या आडून काय साधायचे आहे हे सर्व भाविकांना कळायला मार्ग नाही मात्र त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी गडाच्या नावावरून असे प्रकार करणे अशोभनीय आहे. गड अनेकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि हीच अस्मिता वर्तमान पत्रे ,इलेक्ट्रॉनिक मीडिया ,सोशल मीडिया च्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्याचे प्रकार सुरू आहे. हे सर्व प्रकार पाहून आमच्या सारख्या अनेक गडावर भक्ती असणाऱ्या भाविकांना वेदना होत आहेत. अन् अश्याच वेदना आमच्या सारख्या लाखो लोकांच्या आहेत. गड हा राजकारणाचा विषय नसून भक्तीचा शक्तीचा संगम आहे. यात राजकारण नको व्हायला पाहिजे या मुळे एका प्रकारे गडाची बदनामी होत आहे ही नको व्हायला पाहिजे,नको त्या चर्चा घडवून आपल्याच श्रद्धास्थान असलेल्या शक्तीपीठाची आपण कितपत श्रद्धा अबाधित ठेवत आहोत. हा विचार केला पाहिजे, एकविचाराणे हा विषय मिटला तर गडावर भक्ती श्रद्धा असणाऱ्या भाविकांना वेगळी मनःशांती होईल त्या साठी बीड जिल्ह्यातील संत महंतांनी पुढाकार घेवून समाजातील जुने जाणते ज्येष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत एक सामूहिक बैठक घेत हा विषय लवकरात लवकर संपुष्टात आणून मिटवावा अशी आमच्या सारख्या हजारो भाविक भक्तांची आणि श्रध्दा असणाऱ्या तमाम जनांची अपेक्षा आहे. जेवढ्या लवकर हा प्रश्न मिटेल तेवढ्या लवकर मिटवून घ्यावा व जनते समोर जाहीर करावा खर तर हा विषय हित पर्यंत यायलाच पाहिजे नको होता हा विषय एवढ्या मोठ्या प्रमाणात का लंबवण्यात आला हेच कळायला मार्ग नाही म्हणून यातून गडाची बदनामी होता कामा नये याची दक्षता घेत तत्काळ हा विषय संपवावा अशी कळकळीची भावना पत्रकाद्वारे गडाचे भक्त अविनाश नाईकवाडे ,महेश धांडे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या