23.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

भूमाफियांचे काळे कारनामे आ.संदीप क्षीरसागरांनी सभागृहात उघड केले

भूमाफियांचे काळे कारनामे आ.संदीप क्षीरसागरांनी सभागृहात उघड केले

बीड शहरातील आरक्षित भूखंडावर प्लॉटींग करून अब्जावधींचा घोटाळा

मुंबई : नगरपालिका प्रशासन, नगर रचना विभाग आणि रजिस्ट्री कार्यालय येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भ्रष्टाचार करत बीड मधील भूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील प्लेग्राउंड असो की मंदिर अथवा गार्डन किंवा महिला स्वच्छतागृह या सगळ्यांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर प्लॉटिंग करून या भूमाफियांनी कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवत अब्जावधींचा घोटाळा केला आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि शासनाची मोठी फसवणूक झाली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या भूमाफियांचे कारनामे पुराव्या सकट सभागृहात मांडले असून पुढील दोन महिन्यात याबाबत कारवाई करून संबंधित भूमाफिया यांच्यासोबतच अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री यांनी दिले आहे.
बीड शहराचे नागरिकीकरण वाढल्यानंतर जालना रोड असो की नगर रोड अथवा बार्शी रोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग निर्माण झाले आणि बंगले अपार्टमेंट रो हाऊस तयार करणारी एक भूमाफी यांची टोळी बीडमध्ये सक्रिय झाली. बीड शहरात प्लॉटिंग करताना काही मंडळींनी नगरपालिका प्रशासन नगर रचना विभाग आणि दस्त नोंदणी कार्यालय येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ओपन स्पेस विक्री करत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा होती बीड शहरात भूमाफी यांनी जो काही नंगानाच केला आहे त्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी चे आरक्षित असलेले ग्राउंड असो किंवा गार्डन मंदिर सुलभ शौचालय यासाठी लेआउट मंजूर करताना जी जागा आरक्षित ठेवली आहे तीच जागा सर्वसामान्य प्लॉट धारकांना विक्री करून भूमाफियांनी कोट्यावधी रुपये छापले असल्याचे चर्चा होती. यासंदर्भात मागील सहा सात महिन्यापासून पाठपुरावा करणारे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी आज (दि१५) रोजी सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे आणि संबंधित नगर विकास मंत्र्यांचे लक्ष वेधले. आमदार क्षीरसागर हे या विषयावर आक्रमक झाल्याचे सभागृहात दिसून आले.

===============================
बीड नगरपरिषद अंतर्गत सर्वे नंबर 29 तरफ माळी सर्वे नंबर 194 तर बलगुजर सर्वे नंबर 197 198 199 तरफ खोड सारडा रेसिडेन्सी व इतर, सर्वे नंबर 34 35 68 69 79 तरफ गिराम, सर्वे नंबर 173 तरफ बलगुजार, सर्वे नंबर 53 सर्वे नंबर 56 59 सर्वे नंबर 188 तरफ पिंगळे, सर्वे नंबर 16 सर्वे नंबर 17 तरफ देशमुख सर्वे नंबर 151 सर्वे नंबर 152 तर बोबडे या सर्वे नंबर मध्ये भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात आरक्षित असलेले भूखंड विक्री केले आहेत किंवा चुकीचा लेआउट मंजूर करत भूखंड आरक्षित ठेवलेले नाहीत विशेष बाब म्हणजे प्लेग्राउंड आणि इतर गोष्टींसाठी आरक्षित केलेली जागा या ठिकाणी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार आ.क्षीरसागर यांनी सभागृहात उघड केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या