नवीदोद्दीन सिद्दिकी १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर करणार उपोषण
बोगस गुंठेवारी पी. टी. आर. व बनावट नाहरकत आधारे न. प. मालमत्ता रजिस्टर ला केली जाते नोंद
—————————————-
माजलगाव : नगरपरिषदेच्या मालकीची सर्वे ०५ ०६, ०७,०८ व शहरातली इतर सर्वे नंबर मधील शासकीय राखीव व ओपन स्पेस आणि नदीपात्रावरची राखीव रेड झोन व इतर शासकीय जमीन जिल्हाधिकारी साहेब यांनी जुने सात बारा, फेरफार व नकाशा नुसार तात्काळ न. प. हद्दीतील व इतर शासकीय जमीन शासनाचे ताब्यात घेण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत करिता आपले कार्यालय समोर १५/०७/२०२५ रोजी अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष नवीदोद्दीन सिद्दिकी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. माजलगाव शहरातील नगरपरिषदेचे ओपन स्पेस, घरकुल, इतर राखीव व रेड झोन तसेच शासकीय इतर कोणतीही जमीन माजलगाव चे मुख्य अधिकारी व लिपिक तसेच इतर कर्मचारी यांनी भूमाफियांशी संगमत करत शासकीय जागेची बोगस गुंठेवारी करून बोगस खरेदी विक्री खत तयार करून नामांतरण करत अनेक एकर जमीन नगर नगरपरिषद मालकीची न.प. हदतील व इतर शासकीय जमीनी बेकायदेशीरपणे शासनाची दिशाभूल करून अवैध संचिका गैररित्या बोगस दस्तावेज तयार करून जमीन प्लॉटिंग करून विकून टाकली आहे. शासकीय संपत्तीची विल्हेवाट लावली आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी माजलगाव नगरपरिषद हद्दीतील जमीन व शहरातली सर्व सरकारी राखीव जमीन तसेच ओपन स्पेस जमिन संबंधितांनी विकली आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी नगरपरिषदेच्या हद्दीतील इतर शासकीय जमीनीची मोजणी करून तात्काळ शासनाने ताब्यात घेऊन नगरपरिषद नकाशा, महसूल नकाशा प्रमाणे जुन्या सातबारा व नगर रचनाकार बीड नकाशा प्रमाणे ही सर्व विविध जमीनीचे सर्व बेकायदेशी बनावट गुंठेवारी पी.टी.आर. नामांतरण सातबारा फेरफार रद्द करून तात्काळ शासनाच्या ताब्यात घेण्यात यावे. व या प्रकरणांमध्ये नगरपरिषद मुख्याधिकारी, कर्मचारी व सर्व संबंधितांवर कायदेशीर सर्वांची बीड जिल्हा स्तरावर चौकशी करून व ज्या भुमाफीया यांनी शासकीय, राखीव,ओपन स्पेस जमीन बेकायदेशीर नवा, जुना फेरफार करून गुंठेवारी खरेदी विक्री खत तयार करत नामांतरण करून बेकायदेशीर विक्री केली आहे अशा भुमाफीया वर व संबंधित आधिकारी,पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. नसता लोकशाही मार्गने माजलगाव समाजवादी पक्षाच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. १५ /०७/२०२५ रोजी अमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. यात काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदन नवीदोद्दिन सिद्दिकी समाजवादी पार्टी तथा- महाराष्ट्र बांधकामगार मजदूर संघटना- तालुका माजलगाव- यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दिले आहे.