21.5 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत वैश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पिडीत महिलांची सुटका

बीड : दिनांक 03/07/2025 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड येथे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे शिवाजी नगर ह‌द्दीत भगवान वि‌द्यालयाचे मागील बाजूला, तक्षशिला नगर, धानोरा रोड बीड, येथे दोन महिला बाहेरून महिला बोलावून वेश्या व्यावसाय करीत असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती वरीष्ठांना दिली. त्यावरून वरीष्ठांनी शिवाजी धोंडीबा बंटेवाड, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून शिवाजी धोंडीबा बटेवाड, पोलीस निरीक्षक, तसेच अ.मा.वा.प्र. कक्ष बीड येथील स्टाफ यांनी डमी ग्राहक व पंचांसह सदर ठिकाणी सापळा रचून डमी ग्राहकास सदर ठिकणी पाठवुन खात्री केली असता तेथे असलेल्या महीला एजंट ने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी 1500/- रुपयांची मागणी केली. डमी ग्राहक याने ठरल्याप्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास इशारा केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. पैसे स्विकारलेल्या महिलेला तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव आशा पंडित गायकवाड वय 45 वर्षे रा. मोतीमहल, सुभाष रोड, बीड ता.जि.बीड ह.मु. तक्षशिला नगर, धानोरा रोड बौड असे सांगितले. सदर महिलेची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमुद वर्णनाच्या 500/- रूपये दराच्या तिन नोटा मिळून आल्याने पंचांसमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी 2 पिडीत महिला मिळून आल्या. पिडीत महिलांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी कळवले की, आशाबाई पंडित गायकवाड़ ही व तिची सहकारी कुशीवर्ता मोहन शिराळे रा. धानोरा, ता.जि. बीड यांनी पिडीत महिलांना बोलावून स्वतःचे आर्थिक फायदयासाठी ग्राहकांकडून पैसे घेवून पिडीत महिलांकडून वैश्याव्यवसाय करून घेत असल्याचे सांगीतले. आरोपी आशाबाई पंडित गायकवाड यांची दोन पंचासमक्ष झडती घेतली तिच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या तिन नोटा मिळून आल्या तसेच रुमची झडती घेतली असता USTAD कंपनीचे 12 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. आरोपी क्र 1 आशाबाई पंडित गायकवाड वय 40 वर्षे रा. मोतीमहल, सुभाष रोड बीड, ता.जि.बीड ह.मु. तक्षशिला नगर, धानोरा रोड, बीड, ता.जि. बीड 2. कुशीवर्ता मोहन शिराळे वय 45 वर्षे राधानोरा रोड, ता.जि.बीड असे दोघौनी वर नमूद पिडीत महिलांना स्वतःचे आर्थिक फाय‌द्यासाठी तिला बोलावून स्वतःचे ताब्यातील जागेचा वापर करून, त्याच कमाईवर उदरनिर्वाह करून वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याचे उ‌द्देशाने बोलावले म्हणून त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे अनौतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी धोंडीबा बटेवाड, पोलीस निरीक्षक, पोउपनि मुरकुटे पोह/ 1626 शिंदे पोशि/2210 अशपाक, पोशि/2215 परझणे) स्था. गु शाखा बीड, व पोउपनि पल्लवी जाधव, मपोह/997 उषा चौरे, मपोह / 68 शोभा जाधव, मसफौ/842 मिरा रेडेकर, पोह/2157 प्रदिप येवले, पोह/242 अशोक शिंदे, चालक पोशि/1982 योगेश निधर्धार सर्व ने. अ.मा.वा.प्र. कक्ष बीड. यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या