विद्यार्थ्यांच्या टी. सी साठी फ्लोरोसेंट शाळेची टाळाटाळ
पालकांत तीव्र नाराजी आंदोलनाचा ईशारा
बीड : शहरातील फ्लोरेसेंट उर्दू प्रायमरी स्कूल व सर काझी वकील अहमद उर्दू स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज या शाळेत तिसरी व पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना मागील 10 दिवसांपासून ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) मिळवण्यासाठी सातत्याने शाळेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे पालक वर्गात तीव्र नाराजी पसरली असून अश्या या वागणुकीचा पालकाकडून निषेध केला जात असून या प्रकरण बाबत शिक्षण अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी देखील मागणी पालक वर्गातून केली जात असून पालकांनी वेळेवर अर्ज सादर करूनही शाळेकडून टीसी दिली जात नाही. या शाळेतील शिक्षकाकडून आज या उद्या या आज हेडमास्टर नाही अशा उडवा उडवी चे उत्तरे शिक्षकाकडून पालकांना दिले जात आहे. या शाळेच्या हलगर्जी व मनमानी कारभारामुळे पालक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशावरही परिणाम होत आहे. शाळा ही शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेतील सुविधा वेळेवर देण्यास बांधील असते. मात्र या शाळेतील प्रशासन याला कसलीही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. संबंधित शिक्षणाधिकारी व प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पालकांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.