24.2 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img

वाल्मीक कराडच्या जीवाला धोका, बीडवरून नाशिकच्या कारागृहात हलवण्याच्या हालचालींना वेग!

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या जीवाला बीडच्या जिल्हा कारागृहात धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वाल्मीक कराडची रवानगी नाशिकच्या कारागृहात करण्यात येणार आहे. वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहा ऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह संतोष देशमुख कुटुंबियांनी केली होती. बीडच्या जिल्हा कारागृहात गीते गँग आणि कराड गँगमध्ये वाद झाला होता. आता पुन्हा वाल्मीक कराडच्या जीवाला धोका असल्या कारणास्तव त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे सर्व आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. त्यापैकी वाल्मीक कराडला आता नाशिकच्या जिल्हा कारागृहामध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा कारागृहात असून जिल्हा कारागृहात त्याच्या हालचालींबाबत संशयास्पद बाबी आढळल्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी गीते गँग आणि कराड गँगमध्ये हल्ला झाला होता. पण आता पुन्हा एकदा वाल्मीक कराड आणि अक्षय आठवले टोळीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता वाल्मीक कराडला नाशिकच्या जिल्हा करागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहातून नाशिकच्या जिल्हा कारागृहात हलवण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती समोर आली आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या