बीड : आज दिनांक 01/07/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा रोड, बीड या ठिकाणी पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 मध्ये दोन इसम अग्निशन ताब्यात बाळगुन घेवुन जात आहेत अशी गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार यांना मिळालेने सदर बातमीचे अनुषंगाने खात्री करुन कारवाईकामी तात्काळ पोलीस ठाणे स्थरावर पथक तयार करुन रवाना केले होते. नमुद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे धानोरा रोडवरील पंढरी कॉलनी समोर सापळा रचुन थांबलेले असतांना पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 आल्याने सदर गाडो अडवुन त्यामध्ये दोन इसम ।) आमोल कल्याण पवार वय 29 वर्षे रा. घोडका राजुरी ता.जि. बीड ह.मु. बार्शी नाका, (2) बाबुराव मन्मथ वैराळे वय 33 वर्षे रा. कदमवाडी ता.जि. बीड मिळुन आले. त्यावेळी नमुद दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता अंगझडतीतइसम नामेबाबुराव मन्मथ वैराळे याच्या कमरेला एक गावठी बनावट लोखंडी पिस्टल ज्यास मॅग्जीन असलेला जु.वा.किं.50,000/- रु. असा मिळुन आल्याने सदरचा गावठी पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली पांढ-या रंगाची ह्युडांई XCENT गाडी क्र. MH 05 BJ 1988 जप्त करण्यात आली. आरोपीनां पिस्टल विक्री करनारा इसम 3) राहुल प्रकाश तुपे रा. आशा टॉकीज धानोरा रोड बीड यास त्याच्या राहते घरुन ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपी राहुल प्रकाश तुपे हा मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने बीड जिल्हातुन तडीपार असून त्यावर तो तडीपारीच्या काळात बीड जिल्हात मिळुन आल्याने त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्र.1) आमोल कल्याण पवार यांचे विरुध्द बीड जिल्ह्यातील वेगवेगळया पोलीस ठाणे येथे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र. (2) बाबुराव मन्मथ वैराळे याचे विरुध्द जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे येथे एकुण 02 गुन्हे दाखल असुन आरोपी क्र.3) राहुल प्रकाश तुपे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकुण 07 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर दाखल असलेले गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द चे गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगने अशा प्रकारचे आहेत. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, बीड कमलेश मिना साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पवार, सपोनि संदिप दुनगहु, सपोनि गजानन क्षिरसागर, ग्रे.पो.उप.नि./ अब्दुलखय्युम कुरेशी, पोहवा/1664 रविद्र आघाव, पोना/470 ज्ञानेश्वर मराडे, पोशि/305 दिलीप राठोड, पोशि/617 अशोक राडकर, पोशि/2077 बाजु रहाडे, पोशि/904 लिंबाजी महानोर, पोशि/511 अभिजीत सानप, पोशि/485 विलास कांदे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/ज्ञानेश्वर धोत्रे हे करत आहेत.