बीड : स्व.काकूंनी लावलेल्या लहान रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वृक्षाच्या छत्रछायेखाली तेव्हापासून हजारो कुटुंबांना आधार मिळाला आणि यापुढे मिळत राहील. संस्थेने सर्व जाती धर्माला प्राधान्य दिल्यामुळेच या संस्थेत गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासणारी ही संस्था समाजातील प्रत्येक घटकाला फायदा व्हावा असेच काम करत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते तर व्यासपीठावर डॉ.लक्ष्मण जाधव, हरिभाऊ गायकवाड, शिक्षणाधिकारी विक्रम सारूक, नानासाहेब काकडे, हर्षद क्षीरसागर, सुभाष क्षीरसागर, उषाताई सरवदे, विजय सरवदे, सतिष काटे, अजित जाधव, मकबूलभाई, सुधाकर मिसाळ, एम.बी.सानप, श्रीराम बहीर, मौलाना काझी महंमद, सहाय्यक प्रशासकिय अधिकारी योगेश पवार, एम.ए. राऊत, प्रकाश राठोड, किर्तीताई पांगारकर, इंजि.भाऊसाहेब देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गेल्या 32 वर्षे ज्ञानदानाचे काम करून संस्थेत प्रमाणिकपणे काम करणारे एम.सी. जाधव भटक्या विमुक्त समाजात जन्मलेला एक तरूण उच्च शिक्षण घेवून उत्तम काम करू शकतो आणि सेवा करू शकतो असे लोक संस्थेला मिळाले. शिवाजी पाटोळे याने स्व.काकूंपासून सेवा केली. संस्थेने सेवेत घेताना जात-पात, धर्म कधीच बघीतला नाही, गुणवान लोकांना संधी देवून संस्थेने गुणवान विद्यार्थी घडवले. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. हे बदल स्वीकारत छोट्या रोपट्याने वटवृक्षात रूपांतर केलं आहे. अनेक अडचणीवर मात करत सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेचा प्रत्येक समाज घटकाला फायदा व्हावा असा प्रयत्न राहीला. बीड जिल्हा संवेदनशील जिल्हा आहे. धार्मिक वृत्ती जोपासणात वसा आणि वारसा चालवणारा जिल्हा आहे असे त्यांनी सांगितले. याशिवाय विक्रम सारूक, लक्ष्मण जाधव, हरिभाऊ गायकवाड, महादेव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेषनारायण कोळेकर, प्राचार्य विश्वास कंधारे, मुख्याध्यापक अण्णासाहेब थिटे, धनवंत मस्के, सुरेश पेशकार, व्ही.आर. शिंदे, सुधाकर तांदळे, अंगद दहिफळे, विष्णु जोगदंड, राजेंद्र कुर्हे, शिरीष घरत, विकास बन्सोडे, विलास येडे, आप्पासाहेब येवले, केशव भांगे, प्रशांत पवळ, किशोर उपरे, प्रदिप जगताप, अभिषेक राऊत, रावसाहेब भोसले, शहाजी तेलप, सुनिल शिंदे, रियाज बेग, सुहास अमरापूरकर, प्रफुल्ल भोज यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महिला-पुरूषांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा हंडिबाग यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.श्रीराम जाधव यांनी केले शेवटी प्रा.राजेंद्र गाडेकर यांनी उपस्थितांच आभार मानले.