21.5 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

उमाकिरण शैक्षणिक संकुलातील पीडित मुलींनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी : ॲड.संध्या ताई राजपूत

बीड : शहरातील मध्यवर्ती भागामध्ये उमाकिरण नावाचे मोठे शैक्षणिक संकुल असून या ठिकाणी अनेक कोचिंग क्लासेस असल्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन तरुण-तरुणी शिक्षणासाठी या ठिकाणी येतात पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालक मोठी रक्कम फीस च्या माध्यमातून या ठिकाणी भरून आपले पाल्य जीवनामध्ये चांगले यशस्वी जीवन जगावे व चांगल्या क्षेत्रामध्ये नाव कमवावे यासाठी सदरील शैक्षणिक संकुलामध्ये व तेथे शिक्षण देणाऱ्या शिक्षक व प्राध्यापक यांच्या भरोशावर पाठवत आहेत. परंतु पालकांच्या या विश्वासाला मोठा तडा गेलेला असून उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये पवार व खाटोकर नामक नराधमाने या ठिकाणी शिक्षणासाठी मुलीं चा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. यासंबंधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून सदरील शैक्षणिक संकुलामध्ये यापूर्वीही अनेक शालेय व महाविद्यालयीन तरुणीवर असा प्रसंग झाला असल्याचे चर्चा या ठिकाणी होत असल्यामुळे पीडित असलेल्या तरुणांनी समोर येऊन त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सचिव ॲड. संध्या ताई राजपूत यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या