18.8 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

अरेबियन ज्वेलर्सचा मालक महेबूब मलिकचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर : अ‍ॅड.शेख इमरान

बीड : फ्लॅट, दोन चाकी, चार चाकी वाहन असे आमिष दाखवून लकी ड्रॉ च्या नावाखाली बीडमध्ये सर्वसामान्य नागरिकांना लुटणार्‍या अरेबियन ज्वेलर्सचा मालक महेबूब मलिक यास लाखोंची फसवणूक केल्या प्रकरणी अटकपुर्व जामीन नामंजूर करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, बीडमध्ये अरेबियन ज्वेलर्स या नावाने सोन्याची दुकान आहे व त्यास महबूब मलिक हा नावाचा व्यक्ती चालवतो. त्याने बीड येथे दुकान चालवत असताना सोन्याची व गाडीची लकी ड्रॉ स्कीम चालवली व बीड शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या मोठ्या बक्षिसांचे अमित दाखवून लकी ड्रॉ च्या नावाखाली अरेबियन ज्वेलर्स च्या मालकाने कोट्यावधी रुपये उकळले. व त्यानंतर मागील दोन महिन्यापासून त्याच्या दुकानाचे शटर बंद आहे. शहरातील एक ज्वेलर्स दुकानातून अरेबियन ज्वेलर्स चा मालकाने दिनांक 29. 5. 2024 रोजी 23 लाख रुपये किमतीचे सोने ग्राहकाला दाखवण्यासाठी नेले याविषयी तक्रारदाराने वारंवार पैसे द्या किंवा सोने परत करा अशी मागणी आरोपीला केली परंतु त्यावेळी त्याने उडवा उडवी चे उत्तरे देऊन फसवणूक केली अशी तक्रार ज्वेलर्स मालकाने(तक्रारदाराने) पोलिसात दिले. या प्रकरणी महेबूब मलिक याच्याविरुद्ध कलम 420, 406 भादवी प्रमाणे शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा क्र.93/2025 नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपी अरेबियन ज्वेलर्स चा मालक महबूब मलिक याने मा. सत्र न्यायालय, बीड येथे अटकपूर्व जामीन मिळणे कामे अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जात ॲड.शेख इमरान खाजा इमरान खाजा यांनी आक्षेप घेत न्यायालयासमोर आरोपीने लाखों रुपयांची सर्वसामान्य लोकांची फसवणूक केलेली असल्याबाबत कागदपत्र दाखल करत माननीय न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. व आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली. या कायदेशीर बाबी ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यावेळी आक्षेप अर्जदार यांचे वतीने अ‍ॅड .शेख इमरान खाजा यांनी न्यायालयीन बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड.पंकज रायबोळे, अ‍ॅड.सूर्यकांत पवार, अ‍ॅड. शेख अनवर यांनी सहकार्य केले.

ads

Related Articles

ताज्या बातम्या