बीड : बीड येथील नामांकित उमाकिरण संकुल येथे प्रोफेशल अकादमी मधील विध्यार्थीनी बाबत झालेला प्रकार अतिशय निदानीय आहे आज शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचा महत्वाचा कण मानला जातो परंतु शिक्षकच व्यभिचारी दुराचारी असेल तर मुलानी आदर्श कोणाचा घ्यायचा?, उमाकिरण संकुल मधील प्रोफेशल कोचिंग क्लास मधील प्रशांत खाटोकर, प्रा विजय पवार या नराधमांनी केलेला प्रकार शिक्षकी पेशाला कलमा फासणारा असून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या नराधमाला सोडू नका त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे आवाहन राजेंद्र आमटे, सूरज चुगडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. आज भारत विश्व गुरू म्हणून ओळखला जात असताना गुरू शिष्य परंपरेचा खूप मोठी उज्ज्वल परंपरा असताना शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या बीड येथील नराधमाला सोडू नका. अनेक पालक लाखो रुपये भरून आपल्या मुला मुलींचं भविष्य घडवतील म्हणून कोचिंग क्लास मध्ये मुलांना पाठवतात व मुलांना शिकवणे त्यांना संस्कारीत करण्या ऐवजी हे दळभद्री नराधम असले चाळे करतात यात पोलिसाने नराधमाला भर चौकात नागडं करून ओल्या बाबूने झोडपावे व आरोपीना कसल्याही पळवाटा काढू देऊ नका त्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेंद्र आमटे, सूरज चुगडे यांच्या वतीने देण्यात येत आहे.