17.7 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

चकलांबा पोलिसांची जुगार अड्डयावर धाड सहा आरोपीसह चार मोटारसायकल जप्त


बीड : चकलांबा-पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवायाच्या सूचना दिल्या असल्याने या सूचनेनुसार सोमवारी रात्री गस्त घालत असताना एका शेतात जुगार खेळणाऱ्या सहा जणांना चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी चार मोटारसायकल व सहा मोबाईल असा 3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सपोनि संदीप पाटील हे स्टाफसह सोमवारी रात्री गस्त घालत असताना तरडगाव शिवारातील एका शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस पथकास मिळाली. गस्त घालत असताना ही बाब समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी सदर ठिकाणी धाड मारली असता पोलीसांना पाहून जुगारी यांनी पळ क्ढला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून सहा जणांना पकडले. सदर कारवाईत आरोपींकडून चार मोटरसायकल, सहा मोबाईल व रोख रक्कम 43,300 असा एकूण 3 लाख 58 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चकलांबा पोलिस ठाण्यात याप्रकरणी 1) शहादेव यादव ढोणे राहणार कासरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड 2) रामेश्वर तुळशीराम गाजरे राहणार शेकटा तालुका गेवराई जिल्हा बीड 3) संपत शंकरराव खेडकर रा चकलांबा ता गेवराई जी बीड 4) भागवत शिवराम शिरसाट रा तरडगव्हाण ता शिरूर जिल्हा बीड 5) बदाम हरिभाऊ महानोर रा कसरवाडी ता गेवराई जी बीड 6) पांडुरंग शेषराव बिचकून चकलंबा ता गेवराई जी बीड अशा 6 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक श्री. राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील,परि पो उप नि पवनसिंग अंबरसिंग जंघाळे,पोशिं 2004 कैलास विठ्ठल खटाणे, पोशिं 89 किरण सुनील मिसाळ, पोशिं 231 प्रशांत कल्याण घोंगडे यांनी केली.

ads

Related Articles

ताज्या बातम्या