23.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

पालखी महामार्गावर ट्रक दुचाकीचा समोरासमोर अपघात, एक जण ठार

पालखी महामार्गावर ट्रक दुचाकीचा समोरासमोर
अपघात, एक जण ठार

दिंद्रुड : मेहकर-पंढरपूर पालखी महामार्गावर ट्रक दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला हि घटना आज रविवारी रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. महारुद्र भीमराव लोंढे रा. खालापुरी असे मयत व्यक्तीचे नाव असून, तो तेलगावहून माजलगावकडे दुचाकीवरुन जात होता तर, माजलगावहून तेलगावकडे जाणारा ट्रक क्र. एम एच ४४ ७३७१ आणि दुचाकीची समोरासमोर अपघात झाला यात महारुद्र लोंढेचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगा या अपघातात कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. टालेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महामार्ग बनवणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत गुत्तेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पंचनामा करू देणार नाही अशी भूमिका टालेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली होती. दरम्यान चार वाजेपर्यंत टालेवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी गोंधळ घातला होता. दोन्ही बाजूने दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होते. जोपर्यंत गुत्तेदारावर कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रेत उचलू देणार नाहीत अशी भूमिका टालेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतली होती.

Related Articles

ताज्या बातम्या