गढी जवळ भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
गेवराई : वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना आयशर टेम्पोने भरधाव वेगात धडक दिल्याने यात सहा जणांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील यश आतकरे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. हे वाहन टोचन करुन आणण्यासाठी गेवराईतील बाळु आतकरे, सचिन नन्नवरे, भागवत परळकर, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दिपक सुरय्या है वाहन टोचन करुन आणण्यासाठी गढी कारखान्या नजिक गेले होते. तिथे वाहन टोचन करण्यासाठी महामार्गावर ते उभे असताना बीडहून औरंगाबादला जाणाऱ्या भरधाव आयशर टैम्पोने चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा तरुणांना जोराची धडक दिल्याने सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. सदरील आयशर टेम्पोने नंतर त्याच घटनास्थळापासून पुढे जवळपास 25 जणांना धडक दिल्याचे समजते.