23.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन जातीय रंग देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई : नवनीत काँवत

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करुन जातीय रंग देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक नवनीत काँवत

बीड : जिल्ह्यातील सामाजीक सलोखा आबाधीत राखण्याची जबाबदारी प्रशासना बरोबरच जिल्ह्यातील नागरीकांचीही आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात सोशल मिडीयाचा वापर हा प्रत्येकाने जबाबदारीने करणे अपेक्षीत आहे. असे निदर्शनास आले आहे की, बीड जिल्ह्यात काही नागरीकांकडून आक्षेपार्ह व्हीडीओ किंवा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत. सदर आक्षेपार्ह व्हीडीओ किंवा फोटोची खात्री न करता काही समाजकंटकांकडून ते व्हायरल करुन त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजीक सलोख्याला तडा जात आहे. सोशल मिडीयावर पोस्ट होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टची प्रथम खात्री होणे गरजेचे आहे. तसेच अशा आक्षेपार्ह पोस्ट तात्काळ व्हायरल न करता त्याबाबत लगतच्या पोलीस स्टेशनला जाऊन नागरीकांनी त्या व्हायरल व्हीडीओ/फोटोची खात्री त्याची कायदेशीर सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह व्हीडीओ/फोटो/पोस्ट वर सायबर पोलीस स्टेशनकडुन बारकाईने लक्ष ठेवले जात असुन एखादी व्यक्ती अशा आक्षेपार्ह पोस्ट करतील किंवा तशा पोस्ट व्हायरल करतील अशा व्यक्तीविरुद्ध तसेच अशा आक्षेपार्ह व्हीडीओ किंवा फोटो व्हायरल करुन त्याची शहानिशा न करता किंवा खत्री न करता त्याला जातीय रंग देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तसेच अशा आक्षेपार्ह व्हीडीओ, फोटो किंवा पोस्ट व्हायरल करुन एखादा अनुचीत प्रकार घडुन कायदा व सुव्यवस्थेची परीस्थती निर्माण झाल्यास व त्यातुन होणाऱ्या सार्वजनीक व खाजगी मालमत्तेच्या नुकसानास जबाबदार धरुन अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी सांगीतले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या