दलीत वस्ती रस्ता बाबत अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने नागरिकांवर आली उपोषणाची वेळ
माजलगाव : भीम नगर राजेगाव येथील दलित वस्ती मध्ये जाणारा मुख्य रस्ता शेतकऱ्याने अडवलेला आहे शेतकऱ्याने भर रस्त्यात खोदकाम करून ठेवलेले आहे. आम्हाला त्याचा रहदारीस त्रास होत आहे. या संदर्भात आपल्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. तसेच जिल्हा अधिकारी व पालक मंत्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. प्रसार माध्यमामध्ये बातमी देखील आली आहे.परंतु अद्याप प्रशासकीय यंत्रणा शांत आहे. अधिकारी राजकीय दबावाच्या खाली आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी आम्ही पंचायत समिती कार्यालय समोर 23 मे रोजी बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत या उपोषण मध्ये राजेगांव येथील दलित वस्ती मधील सर्व महिला व पुरुष या उपोषण मध्ये सहभागी राहणार आहेत. असे निवेदन माजलगाव तहसिलदार यांना देण्यात आले. या वेळी सर्जेराव शिंदे, अनिल साळवे, दिनेश साळवे, नितीन साळवे, सिद्धार्थ साळवे सह कार्यकर्ते उपस्थित होते.