23.5 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img

भारतीय सैनिकांसाठी उद्या बीडमध्ये मोटरसायकल तिरंगा रॅली

भारतीय सैनिकांसाठी उद्या बीडमध्ये मोटरसायकल तिरंगा रॅली

देशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : शेख निजाम

बीड : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यावर जशास तसे उत्तर भारत देत आहे. भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी उद्या दि.11 मे 2025 रोजी सकाळी दहा वाजता बीडमध्ये मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. एक देशभक्त, भारतीय नागरिक म्हणून ही रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये देशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेख निजाम यांनी केले आहे. भारतीय सैनिकांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानवर एअरस्ट्राइक करत प्रत्युत्तर देऊन अनेक दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले. पहलगामच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जखमा ओल्या असताना क्षणार्धात पाकिस्तानात घुसून आपल्या भारतीय भुदल,नौदल आणि हवाईदलाच्या जांबाज आधिकाऱ्यांनी आणि जवानांनी दाखविलेल्या साहसाला आणि धैर्याला सलाम करून खरोखरचं देशप्रेमाची भावना जागी करण्यात आली. यामुळे बीडमध्ये उद्या दि. 11 मे रोजी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढून भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुतळ्यापासून दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. माळीवेस, सुभाष रोड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. यामध्ये देशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेख निजाम,शेख अमर,कय्युम इनामदार,सय्यद फईम,जयंत वाघ, सत्तार इनामदार,सय्यद आझम,शेख जाकीर,शेख नसिर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या