18.3 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

आष्टीजवळ पिकअप वाहनाचे टायर फुटल्याने तीन मजूर ठार

आष्टी : धामणगाव कडून कडा येथे येत असलेल्या महिंद्रा पिकप या वाहणाचा अपघात होऊन तीन जण जागीच मृत्युमुखी पडले तर सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहनाचे टायर फुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धामणगाव येथून जवळच असलेल्या वंजारवाडी या गावातील मजूर धामणगाव मार्गे कडा येथे कांदा भरण्यासाठी येत असताना महेंद्र पिकप हे वाहन देवी निमगाव जवळ रस्त्याच्या खाली जाऊन धडकले यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 20 जन जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ अहमदनगर येथे तर काही जखमींना कडा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हि घटना आज दिनांक १ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर घडली. या दुर्घटनेत श्रावणी विक्रम महाजन (वय १४), ऋतुजा सतीश महाजन (वय १६), व अजित विठ्ठल महाजन (वय १४) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या