बीड : काल दिनांक 30/04/2025 रोजी बीड शहरातील पेठ बीड भागात VIP लॉन्स समोर, बीड परळी रोडवर एका गोडाऊन मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा अवैधरीत्या साठवलेला असल्याची गोपनीय माहीती पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसुदन घुगे नेमणुक नियंत्रण कक्ष यांचे पथकास सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले. सदर पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी दोन पंचांसह जाऊन खात्री केली. त्यावेळी VIP लॉन्स समोर, बीड परळी रोडवर एका अर्धवट बांधकाम असलेल्या बंद गोडाऊन मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटखा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दोन पंचांसमक्ष सदर गोडाऊन उघडले असता गोडाऊन मध्ये 9,28,500/- रुपये किमतीच्या एकूण 35 गोण्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा मिळून आल्याने त्याचा सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पो.ह/690 शेख नासीर शेख बशीर यांच्या फिर्यादीवरून आरोपी 1. शेख इकबाल शेख रशीद 2. शेख जावेद उर्फ बब्बू रा. बीड यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन पेठबीड गुर.नं. 124/2025 भा. न्या.सं. सह कलम 123, 274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पेठबीड पोलीस करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मधुसुदन घुगे नेमणुक नियंत्रण कक्ष, पो.ह./1682 शरद बहीरवाळ, पो.ह./148 धनंजय गायकवाड, पोशि/887 अविनाश सानप, पोशि/407 कुलदीप गुंजाळ, यांनी केली आहे. नागरीकांना अवैध धंद्यांबाबत तसेच इतर गोपनीय माहीती द्यावयाची असल्यास त्यांनी संवाद प्रकल्पचा QR Code स्कॅन करुन त्यांची तक्रार देवू शकतात. तक्रारदारचे नांव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी केले आहे.