जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली बीडचे
नवे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड : बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना बढती देण्यात आली असून मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. तर बीड जिल्हाधिकारीपदी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बीडमध्ये दीपा मुधोळ हे जिल्हाधिकारी होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची बदली करण्यात आली होती. आता विवेक जॉन्सन यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.