जुन्या वादातून तरुणासह आईचा अपहरण करत अमानुष मारहाण
शिरूर : शिरूरमध्ये जुन्या वादातून तरुणाचे आईसह अपहरण करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिरुर पोलीस ठाण्यातील हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतरही आरोपी फरार असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरमधील घाटशीळ पारगावमध्ये जुन्या वादातून तरुण आणि त्याच्या आईला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांचेही अपहरण करण्यात आले. त्यानंतर मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या मारहाणीमुळे तरुणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. कृष्णा दादासाहेब घोडके असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपी फरारच आहेत. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा घोडके या तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. मारहाण करण्याऱ्या आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मंगेश तांबारे तरुणाला अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी उर्वरित तरुण फरार आहेत. गुन्हा घडून ४२ दिवस झाले तरी प्रमुख आरोपींना अटक न केल्याने पीडित तरुणाने पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. आरोपींना अटक केली नाही, तर कुटुंबासहित उपोषणाला बसण्याचा इशारा पीडित तरुणाने दिला आहे.