अजितदादा अॅक्शन मोडवर स्वारगेट प्रकरणात २३ सुरक्षा रक्षक निलंबित
पुणे : स्वारगेट स्थानकावर २६ वर्षीय तरूणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ज्या बसमध्ये ही घटना घडली होती, तेथून सुरक्षा रक्षकाची केबिन काही अंतरावरच होती, मग सुरक्षा रक्षक कुठे गेले होते, असा सवाल करत ठाकरे गटातील वसंत मोरे यांनी एसटी डेपोची तोडफोड केली. यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. तर याप्रकरणी आता २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. अशी माहिती समोर येत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
स्वारगेटबसस्थानकातीलघटनाक्लेशदायक, संतापदायक, शरमेनेमानखालीघालायलालावणारी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पहाटे फलटणला चाललेल्या एका तरूणीवर शिवशाई बसमध्ये दत्तात्रय साठे या तरूणाने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर संबंधित तरूणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. यावर पोलिसांनी तात्काळ एसटी डेपो गाठत घटनेची चौकशी केली. तर विरोधकांनीही या घटनेवरून सरकारवर टिका केली.