बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाची माहिती कळताच सगळ्यानाच धक्का बसला. अतिशय मनमिळावू होती. बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाची घटना मनाला सुन्न करणारी आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहे. मित्रपरिवारातील हसरा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सायं. दै. माझी सरकार परिवार सहभागी आहे.