पूर्वी नवीन कार विकत घेताना लोकं फक्त किंमत आणि मायलेज या दोन गोष्टींकडेच पाहायचे. पण आज ही स्तिथी बदलली आहे. आज लोकं मायलेज पेक्षा जास्त प्राधान्य सेफ्टी फीचर्सना देताना दिसतात.जर तुम्ही सुद्धा यातही कारमध्ये एअरबॅग्स असणे प्रत्येक कार खरेदीदाराला सुरक्षेची हमी देते.
सध्या अनेक कार्सच्या NCAP क्रॅश टेस्टिंग होत असतात. या टेस्टिंगमध्ये जर एखाद्या कारला 5 स्टार सेफ्टी रेटींग मिळाली तर ती कार सेफेस्ट कार मानली जाते. तसेच या सुरक्षित कारवर ग्राहकांचा विश्वास सुद्धा कैक पटीने वाढतो.
पूर्वीच्या तुलनेत, भारतातील लोक आता सेफ्टी फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कार खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कंपनीजही अनेक अत्याधुनिक सुविधांनी युक्त वाहने आणत आहेत. आता प्रत्येक पॅसेंजर कारमध्ये 6-एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताच्या वेळी प्रवाशांना सुरक्षितता मिळते. असे असूनही प्रवाशांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काही चुकांमुळे, कारमध्ये बसवलेल्या एअरबॅग देखील तुमचे संरक्षण करणार नाहीत. चला या चुकांबद्दल जाणून घेऊया.
कारमध्ये एअरबॅग असो वा नसो, सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे. मात्र, एअरबॅग असलेल्या कारमध्ये सीट बेल्ट न लावणे धोकादायक ठरू शकते. वास्तविक, अलीकडील सर्व कारमध्ये असे काही फिचर असतात, ज्यात जर तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर एअरबॅग उघडत नाहीत. यासाठी सीट बेल्ट घालण्यास कधीही विसरू नका.
ड्रायव्हरच्या बाजूची एअरबॅग नेहमी स्टेअरिंग व्हीलमध्ये इन्स्टॉल केली जाते. या कारणास्तव, एखाद्याने स्टेअरिंगच्या जवळ बसू नये, कारण एअरबॅग उघडल्यास ड्रायव्हरच्या चेहऱ्याला दुखापत होऊ शकते. त्याच वेळी, जर तुम्ही स्टेअरिंग व्हीलच्या खूप जवळ बसलात तर एअरबॅग व्यवस्थित उघडत नाही, ज्यामुळे ड्रायव्हरला पूर्ण संरक्षण मिळत नाही.
अलीकडच्या काळात येणाऱ्या सर्व वाहनांना 6-एअरबॅग देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कारमध्ये सहचालकासाठी सुद्धा एअरबॅगही असतात. एअरबॅग उघडण्यासाठी ते डॅशबोर्डवर आदळते. गाडीच्या डॅशबोर्डवर कोणतीही वस्तू ठेवल्यास सहचालकाला इजा होऊ शकते.
काही वाहनांमध्ये साइड एअरबॅग देखील असतात. अशा वाहनांमध्ये अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. बहुतेक कारमध्ये, सीटच्या आत साइड एअरबॅग्ज इन्स्टॉल केल्या जातात. सीट कव्हर असल्यामुळे ते उघडू शकत नाहीत. त्यामुळे प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. म्हणूनच, नवीन सीट कव्हर लावण्यापूर्वी करण्यापूर्वी निश्चितपणे तपासा.
सहचालकाने चालत्या कारमध्ये डॅशबोर्डवर पाय ठेवू नये. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. किंबहुना, एअरबॅग हलक्या धक्क्यानेहि उघडू शकते. जर तुमचा पाय डॅशबोर्डवर असेल तर यामुळे तुमचा पायही मोडला जाऊ शकतो.