कंपन्यांकडून नवनवीन दुचाकी वाहने लॉंच करण्यात आली.
प्रामुख्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या विशेष ऑफर्सही याकाळात कंपन्यांकडून दिल्या गेल्या होत्या. आता वर्षअखेरच्या दीड महिन्यात विक्री वाढवण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून केला जातोच शिवाय याकाळात नवीन उत्पादन लॉंच होण्याचे प्रमाण कमी असल्याने याचा फायदा करुन घेण्यासाठी काही प्रमुख कंपन्या नवीन उत्पादनही लॉंच करतात. दरम्यान, केटीएम (KTM) या अग्रेसर टू व्हीलर्स कंपनीनेही आज त्यांच्या सुपरबाईक्स भारतात लॉंच केल्या आहे. जाणून घेऊया याबद्दल
KTM ने भारतात 1390 Super Duke R सह अनेक सुपरबाइक लॉंच केल्या आहेत. KTM 1390 Super Duke R ची एक्स शोरुम किंमत 22.96 लाख रुपये आहे आणि ती डुकाटी स्ट्रीटफाइटर V4 ची मोठी स्पर्धक ठरणार आहे. ही बाईक केटीएम 1290 सुपर ड्यूकची उत्तराधिकारी ठरणार आहे .
इलेक्ट्रॉनिक्स आणि डिझाइन
बाईकमध्ये प्रगत ट्रॅक्शन कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि द्वि-दिशात्मक क्विकशिफ्टर यासह अनेक राइड मोड्स समाविष्ट आहेत. एक ब्लूटूथ-सक्षम TFT स्क्रीन आहे जी सर्व वैशिष्ट्ये नियंत्रित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कंपनी मोटरसायकलवर ‘डेमो मोड’ ऑफर करते. डेमो मोडचा उद्देश रायडर्सना काही फंक्शन्ससह ऑफर करणे आहे जे पहिल्या 1500km मध्ये वापरता येतील. वापरकर्ते डीलरशिपवर फीचर्स निवडल्यास ते कायमस्वरूपी अनलॉक करू शकतात. डिझाईनच्या बाबतीत, KTM 1390 Super Duke R ला मस्क्यूलर आणि आक्रमक डिझाइन मिळते.
बाईकचे इंजिन, ब्रेक आणि सस्पेंशन
KTM 1390 Super Duke R मध्ये 1350cc, LC8, V-ट्विन इंजिन आहे जे 190hp @10,000rpm आणि 145Nm @8000rpm निर्मिती करते. सस्पेंशनच्या बाबतीत, मोटरसायकलला पुढील बाजूस WP USD फोर्क आणि मागील बाजूस WP मोनोशॉक मिळत आहे. ब्रेक्सबदद्ल विचार केल्यास, 320mm डिस्कचे पेअर समोरच्या बाजूस असून 240mm डिस्क मागील बाजूस दिली जाते.
बाईकचे टायर, वजन
KTM 1390 Super Duke R ला 17-इंच चाकांवर Michelin Power GP टायर मिळतात. इंधन टाकीची क्षमता 17.5 लीटर आहे. बाईकचे इंधनशिवाय वजन हे 200.5 किलो आहे. पॉवर-टू-वेट रेशो 1:1 आहे. केटीएमच्या इतर बाईक्स प्रमाणे या बाईकचे वजन जास्त आहे त्यामुळे वेगाने चालवताना बाईक ही स्थिर राहते.
केटीएमच्या अनेक सुपरबाईक्सची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. बाईकचा आकर्षक लूक हा तरुणांना जास्त भावतो. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात केटीएमच्या बाईक्सची मागणी असते. त्यामुळे कंपनी भारतीय बाजारपेठेवर विशेष लक्ष देत आहे. आता केटीएम 1390 लॉंचिगमुळे कंपनीने भारतीय ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. तसेच देशातील केटीएमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठीही ही बाईक एक आव्हान उभ करणार आहे.