परळी वैजनाथ : कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. समर्थ धोकटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बीड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत, तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचा प्रचार व्हावा यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. त्यांच्या यशाबद्दल कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.