मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले तर मग बॉम्बस्फोट कोणी केले? : माजी खा. इम्तियाज जलील
सुप्रीम कोर्टात दाद मागणार : पीडित शेख लियाकत
औरंगाबाद : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला आहे. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. याच प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि अन्य सहा जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए कोर्टात मालेगाव बॉम्बस्फोटाची गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना एमआएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले असेल, तर मग बॉम्बस्फोट कोणी केले? हा प्रश्न कायम राहतो. शहीद हेमंत करकरे यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा तपास केला होता. त्यामुळे आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मात्र या निकालाबद्दल आश्चर्य व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तत्कालिन पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. मालेगाव बाॅम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद समोर आला होता. दहशत निर्माण करण्यासाठी हे केले गेले होते. आता यातील सगळे आरोपी निर्दोष असतील, तर यामागे कोण होते? स्फोट कोणी घडवले? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तुरुगांत डांबण्याची हिमंत कोणी केली? पुरोहित नावाचे लष्करी अधिकारी देखील या प्रकरणात आरोपी होते, मग त्यांनाही अडकवण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यातून न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, असे इम्तियाज जलील म्हणाले. त्याकाळात जेव्हा आर आर पाटील पाटील राज्याचे गृहमंत्री होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांनी अस केले असेल का? की दहशतवादी हल्ला झाला आहे, कोणाला तरी पकडून आणूयात जेलमध्ये टाकू? असे असेल का? काहीतर तथ्य असल्याशिवाय त्यांनी यांच्यावर आरोप लावले असतील का? असा सवाल एमआएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.साध्वी प्रज्ञा आणि एक लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्णल प्रसाद पुरोहीत यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता, एका समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा दहशतवाद हल्ला घडवून आणण्यात आला होता, यासंदर्भातील पाठपुरावा हेमंत करकरे यांनी केला होता. दुर्दवाने त्यांची हत्या करण्यात आली. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना खासदार करुन भारतीय जनता पार्टी ने या केसचा राजकिय फायदा घेतला, त्यांनी एक देशाला संदेश दिला की आमच्याकडे चांगले लोक नाहीत अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.
सुप्रीम कोर्टात दाद मागणार : पीडित शेख लियाकत
29 सप्टेंबर 2008 रोजी हा स्फोट झाला होता. भिक्खू चौकात हा स्फोट झाला होता. अभिनव भारतचे नाव या स्फोटाने समोर आले होते. त्यानंतर गेल्या 17 वर्षात या खटल्याने अनेक वळणं पाहिली. आज या खटल्याचा निकाल लागला. त्यात सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. त्यावर पीडितांनी नाराजी व्यक्त केली. या स्फोटात शेख लियाकत मोईउद्दीन यांनी त्यांची मुलगी गमावली होती. त्यांनी माझी मुलगी वडापाव आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. नंतर कळालं तिचा देखील ब्लास्ट मध्ये मृत्यू झाला. आजचा विशेष न्यायालयाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. खूप चुकीचा निर्णया झाला आहे. हेमंत करकरे यांनी अत्यंत सखोल तपास केला. अनेक पुरावे देखील सादर केले. तरी देखील निर्दोष मुक्तता झाली. आम्ही या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असे शेख लियाकत मोईउद्दीन यांनी सांगितले.