बीड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या बीड – अहिल्यानगर या २४ .५ किलोमीटर रस्त्याच्या कामाला सव्वा वर्षापुर्वी सुरूवात झाली. डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.विशेष म्हणजे ४ महिन्यांपूर्वी तयार केलेल्या सिमेंट रस्त्याला काही ठिकाणी खड्डे,तडे गेल्याने,भेगा पडल्याने दुरुस्ती करण्यात येत आहे. या १५९ रूपये किंमतीच्या बेसुमार दर्जाच्या रखडलेल्या कामामुळे काल एका वकील तरुणाला आपला जीव गमवावा लागला असुन याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. बुधवार दि.३० रात्री शहरानजीकच्या तिप्पटवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला असुन वैभव महारूद्र सांगळे वय २५ वर्षे रा.उक्कडपिंप्री ता.गेवराई असे अपघातात ठार झालेल्या तरुण वकिलाचे नाव आहे.४ महिन्यापुर्वीच तयार केलेल्या रस्त्याला तडे,भेगा पडल्याने उकडलेल्या ,भेगा पडलेल्या ठिकाणी दुरुस्ती सुरू आहे. त्यासाठी एका बाजूचा रस्ता बंद केल्याने दोन्ही बाजूंची (अहिल्यानगर कडून येणारी आणि बीड कडुन जाणारी वाहने) वाहतूक एकाच बाजूने सुरू राहिली. दरम्यान दुचाकीला कारने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वैभव सांगळे या तरुणाचा मृत्यू झाला. वैभव दुचाकीवरून राजुरीकडून बीड कडे येत असताना समोरून आलेल्या कारची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला. अनेक वर्षापासून रखडलेल्या बीड – अहिल्यानगर या महामार्गाच्या २४.५ किलोमीटर रस्ता कामासाठी १५९ कोटी रुपयांचा निधी केंद्रीय महामार्ग निधीतुन उपलब्ध झाला आहे. जून २०२४ मध्ये रस्ता कामाची सुरुवात झाली. डिसेंबर २०२४ पर्यंत काम करण्याची मुदत होती. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने तीन किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला नाही. तसेच नाली व दुभाजकाचे कामही अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. कामाच्या विलंबाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी साकेत कन्स्ट्रक्शन कंपनीवर १ कोटी रुपयांचा दंड ठोठावुनही सुधारणा झालेली नाही. दरम्यान ४ महिन्यापूर्वी सिमेंट रस्ता बांधूनही उखडलेल्या भेगा पडलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.
४ महिन्यातच उखडलेल्या,भेगा पडलेल्या रस्त्याची दुरुस्ती तरीही अभियंता राजेंद्र भोपळे म्हणतात काम दर्जेदारच : डॉ.गणेश ढवळे
—-
तब्बल १५९ कोटी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या नगररोडचे काम ४ महिन्यांपूर्वीच झालेल्या रस्ते कामाला काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी तडे,भेगा पडलेल्या आहेत. संबंधित प्रकरणात तक्रार केल्यानंतर महामार्ग प्राधिकरण बीड विभाग अभियंता राजेंद्र भोपळे म्हणतात सिमेंटचा थर देताना चुकुन रेक्झिनचा एक बंच क्रांक्रीटमध्ये गेला होता तो काढताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खड्डे पडलेलेले आहेत.खड्डे बुजविण्यात आले असुन काम दर्जेदारच झाले आहे.आठ ते दहा ठिकाणी उकडलेल्या,भेगा पडलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असुन काम करताना बॅरिकेट्स व तत्सम सर्व उपाययोजना करून दिशादर्शक ही लावण्यात आले आहेत. असे म्हणत दर्जाहीन कामाला दर्जेदार कामाचे प्रशस्तिपत्र देऊन टाकत आहे. एकंदरीतच डॉ.राजेंद्र भोपळे कंत्राटदाराची पाठराखण करताना दिसुन येत आहे.