31.1 C
New York
Monday, August 4, 2025

Buy now

spot_img

आ.संदीप क्षीरसागरांनी बीड मतदारसंघातील महावितरणाशी संबंधित प्रश्न मंत्रालयीन बैठकीत मांडले

आ.संदीप क्षीरसागरांनी बीड मतदारसंघातील महावितरणाशी संबंधित प्रश्न मंत्रालयीन बैठकीत मांडले

अनियमित वीजपुरवठा, कंत्राटदारंकडून होत असलेल्या निकृष्ट कामांची केली तक्रार

आ.क्षीरसागरांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्दयाच्या अनुषंगाने आयोजित केली होती बैठक

बीड : नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी महावितरण विभागाचा गलथान कारभाराची सभागृहात चीरफाड केली होती. गुत्तेदार आणि अधिकारी यांच्या मिलीभगत ने चालू असलेले सर्व गैरप्रकार मुद्देसूद मांडले होते. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या उर्जा राज्यमंत्री ना.मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली, बीड जिल्ह्यातील उर्जा विभागांशी संबंधित प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघातील महावितरणशी संबंधित असलेले विविध प्रश्न आ.संदीप क्षीरसागर यांनी मांडले विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ८ जुलै रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी महावितरण विभागाचा गलथान कारभार उघड केला होता. गुत्तेदार आणि अधिकारी संगनमत करून कशाप्रकारे गैरप्रकार करतात हे उघडकीस आणले होते. हा मुद्दा अधिवेशनात गाजला होता. त्यानंतर याची दखल घेत सरकारने बुधवारी (दि.३०) रोजी मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या उर्जा राज्यमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील उर्जा विभागाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील विद्युत पुरवठ्यातील अनियमितता, तसेच कंत्राटदारांमार्फत होत असलेल्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबत थेट तक्रार मांडली. तसेच नागरिकांच्या त्रासदायक अनुभवांना वाचा फोडत, विद्युत पुरवठा सुरळीत आणि दर्जेदार व्हावा यासाठी उर्जा विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशी स्पष्ट मागणी केली.

आ.संदीप क्षीरसागर यांनी बैठकीत उपस्थित केलेले मुद्दे आणि मागण्या…

-> RDSS योजनेंतर्गत दि.१५.०९.२०२३ रोजी हायटेक ईलेक्ट्रीकलच्या नावे कार्यारंभ आदेश पारीत आहेत. आजतागायत ती कामे पुर्ण न होता ग्रामीण व शहरी भागात निकृष्ट दर्जा व अर्धवट स्वरूपाची कामे केल्याने तक्रारी प्राप्त आहेत. यावर तातडीने कार्यवाही व्हावी.

-> पाली ता. बीड येथे मंजुर असलेले ३३ के.व्ही. उपकेंद्राचे कामाची निविदा प्रसारित करणे.

-> ताडसोन्ना, लिंबारुई, च-हाटा, आहेरधानोरा, बोरखेड, मोरगाव ता. बीड, पाडळी, आर्वी ता. शिरूर का. व नगर रोड व बलगुजर (बीड शहर) या ठिकाणी नवीन उपकेंद्र मंजुर करणे.

-> अंजनवती ता. बीड उपकेंद्रामध्ये अतिरिक्त पावर ट्रान्सफार्मर बसवणे.

-> खापरपांगरी व पारगाव सिरस ता. बीड येथे नवीन सबस्टेशन २२० के.व्ही.चे मंजुर करणे.

-> ADB योजने अंतर्गत बोरखेड व चहऱ्हाटा ता. बीड येथे उपकेंद्र उभारण्यात यावे.

-> ADB योजनेमध्ये मंजुर असलेल्या कामांची निविदा प्रसारित करणे बाबत सुचित करावे.

-> बीड शहर, बीड तालुका व शिरूर का. तालुका गाव अंतर्गत, शहर अंतर्गत विद्युत तारा लोबकळेल्या आहेत. तसेच विद्युत पोल वाकलेले आहेत. यांची आवश्यक ठिकाणी दुरूस्ती करावी तसेच वाकलेले पोल आणि लोंबकळत असलेल्या विद्युत तारा बदलण्यात याव्यात.

-> मुख्यमंत्री सौर उर्जा अंतर्गत शेतकरी बांधवांना देण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. त्या बाबत संचिकानिहाय चौकशी करण्यात यावी.

-> सन २०२० ते जुलै २०२५ या दरम्यान बीड विधानसभा मतदार संघात बीड शहर, बीड तालुका व शिरूर का. तालुका अंतर्गत सर्व लेखाशिर्ष अंतर्गत विकास कामे होत असतांना मोठ्या प्रमाणावर दुबारीकरण (ओव्हरलॅपिंग) झालेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.

-> बीड शहराची हद्दवाढ २००७ दरम्यान झालेली आहे. त्यानुषंगाने बीड शहरासाठी नव्याने ३०० पोल, तार, डी.पी. व इतर सामग्री देण्याची मागणी केली.

-> बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर का. तालुका नवीन डी.पी.ची आवश्यकता असून मंजुर करणे बाबत मागणी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या