रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचा डॉ.योगेश क्षीरसागरांकडून सत्कार
बीडमधील संपर्क कार्यालयास भेट; आ.धनंजय मुंडे, रुपाली चाकणकरांसह नेत्यांची उपस्थिती
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी रविवारी (दि.२०) बीड शहरातील डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीनिमित्त डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खा.तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, आनंद परांजपे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, लतिफ तांबोळी, जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, महिला आघाडीच्या ॲड. प्रज्ञा खोसरे, रमेश आडसकर, युवा नेते बळीराम गवते, अविनाश नाईकवाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीदरम्यान आगामी संघटनात्मक कामकाज, पक्ष विस्तार, तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.