बीड : परळी येथील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या. परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची ऑक्टोबर 2023 मध्ये निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला 18 महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही. या प्रकरणी त्यांनी अनेकदा बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. पण पोलिस तपास पुढे सरकला नाही. याला कंटाळून आज त्यांनी आपल्या कुटुंबासह बीड पोलिस अधीक्षक कार्यालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांचे आई-वडील व मुले आक्रमक झाल्याचे दिसून आले. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकारानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.