बीड : हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब व संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसेनेच्या दमदार कार्यपद्धतीस प्रभावित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, तालुकाप्रमुख वडवणी माऊली गोंडे, तालुकाप्रमुख धारूर नारायण कुरुंद यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातून रामदास भाई ढगे, संदिप माने, शिवाजी सावंत, महादेव मस्के, रमेश कुरकुटे, दत्ता सावंत, रमेश चौधरी, ज्ञानेश्वर मोरे, शिवाजी गोंडे, माऊली आगलावे. धारूर तालुक्यातून अनंत चिंचाळकर, शेख गफार शेख सत्तार, वशिष्ठ सातपुते , अनिल गांजले, सुनील कोमटवार, अमोल शिरसाट, दीपक चिद्रवार, विशाल भैरे यांच्या समावेत असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी काल दि. 15 जुलै 2025 रोजी रात्री11 वाजता दरम्यान मुक्तागिरी निवासस्थान, मुंबई येथे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिंदे साहेबांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत, या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. यामुळे जबाबदारी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा आणि कामाला लागा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रवेश सोहळ्या दरम्यान सर्वांना संबोधित केले.