28 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

बीड प्रकरणाचा तपास महिला आय पी एस अधिकाऱ्याकडे, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बीड येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीच्या झालेल्या लैंगिक शोषणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. प्रस्तुत प्रकरणाची संभाव्य व्याप्ती तथा संवेदनशीलता लक्षात घेऊन सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेईल. एका वरिष्ठ दर्जाच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्य नेतृत्वात ही समिती कालबद्धपणे आपला तपास करून या गुन्ह्याचा छडा लावेल. या प्रकरणी कुणालाही पाठिशी न घालता पीडित मुलींना न्याय देण्यात येईल, असे ते म्हणालेत. भाजप सदस्य चेतन तुपे यांनी बीडमधील लैंगिक शोषणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य या महाराष्ट्रात घडले आहे. बीडमधील एका कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक झाली आहे. त्यांच्यावर पोस्कोचा गुन्हाही दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. सरकारने या प्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

ads

Related Articles

ताज्या बातम्या