28 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

माजलगावात बापाने मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून केली हत्या

माजलगाव : माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने मुलाची हत्या केली. बापाने मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहित कांबळे आणि त्याचे वडील गोपाळ कांबळे या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी गोपाळने जवळच पडलेला खोऱ्याचा दांडा रोहितच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलिस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरूनच अटक केली.

ads

Related Articles

ताज्या बातम्या