बीड : महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावं या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आज ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी भेट घेतली. यावेळी मिडीया शी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात या संदर्भात निवेदन करावं आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तर दीड वर्ष होऊनही एखाद्या हत्येतील आरोपी निष्पन्न होत नाहीत हे खरंतर दुर्दैव आहे. बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबाच्या संदर्भात तपास करावा असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच पोलीस अधीक्षकांशी फोनवरून संवाद साधला असुन त्यांनी तपास अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं असंही दिपक केदार यांनी म्हटलं. तर दिपक केदार यांच्यासमोर महादेव मुंडे यांच्या आईने टाहो फोडला. बीडच्या जिल्हा रुग्णालयासमोरील गेटवर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महादेव मुंडेंना न्याय देण्याची मागणी केली.