28 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

लिंबागणेशमध्ये शिवम मशीनरी अँड इलेक्ट्रिकल्स दुकान फोडून सहा लाखांचा ऐवज चोरीला

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीराम पाठक यांच्या मालकीच्या शिवम मशीनरी अँड इलेक्ट्रिकल्स या दुकानात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली. श्रीराम पाठक हे काल गेवराई येथे नातेवाईकांच्या लग्नास गेल्यामुळे दुकान दिवसभर बंद होते. गुरुवारी सकाळी अशोक वायभट यांनी फोन करून दुकानाचे शटर तुटले असल्याची माहिती पाठक यांना दिली. त्यांनी तात्काळ दुकानात धाव घेतली असता, चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करून वायंडिंग वायर, स्क्रॅप यासह एकूण अंदाजे ५.५ ते ६ लाख रुपयांचा माल लंपास केल्याचे समोर आले. तसेच दुकानातील गल्ला फोडून त्यामधील ५ ते ६ हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती श्रीराम पाठक यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे पोउनि. अप्पासाहेब रोकडे, पो. विशाल क्षीरसागर तसेच लिंबागणेश पोलीस चौकीचे स.फौ. बाबासाहेब राख, गोविंद बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या चोरीप्रकरणी सपोनि. चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या